Sangeet Jagat संगीत जगत
Donate

भजनाचे महत्त्व (संतांचे अभंग गायन) – वैज्ञानिक दृष्टीने आणि आध्यात्मिक रितीने

भजन ही केवळ भक्ती नव्हे, तर ती मेंदू, मन आणि शरीरावर खोल परिणाम करणारी एक विज्ञानाधारित क्रीया आहे आणि दररोज, सातत्याने केली गेली, तर साधना देखिल आहे…

१. मेंदूमधील आनंददायक रसायने वाढतात…

• जेव्हा आपण भावनेने भजन करतो, तेव्हा डोपामिन (आनंददायक संप्रेरक) आणि ऑक्सिटोसिन (स्नेह व

विश्वास वाढवणारं संप्रेरक) वाढतं.

• यामुळे तणाव कमी होतो, मन हलकं वाटतं, आणि आपल्या आराध्याशी (देव वा गुरू) जवळीक वाटू लागते.

२. मेंदूच्या दोन्ही बाजूंचं संतुलन…

• अभंगात शब्द (बुद्धी) आणि सूर (भावना) दोन्ही असतात

• त्यामुळे बुद्धी आणि भावना यांचं संतुलन निर्माण होतं — मनाची निर्णयक्षमता व स्थैर्य वाढतं…

३. नादोपचार (Vibrational Healing)

• सूर आणि जपामुळे शरीरात नाद लहरी निर्माण होतात, ही स्पंदनं वेगस नर्व्हलर (शांतता देणारी नाडी)

सकारात्मक परिणाम करतात.

• यामुळे हृदयाचा ठोका स्थिर होतो, श्वास शांत होतो, आणि मन ध्यानमग्न होतं.

४. भावनिक विश्रांती व मनोबल…

• अभंगात भक्ती, वेदना, समर्पण, प्रार्थना — या भावना असतात.

• त्या गायल्याने मनातली खदखद बाहेर पडते, आणि आतून शांत वाटतं, मनोबल वाढतं…

५. सामूहिक भजनाचे फायदे…

• जेव्हा अनेकजण मिळून भजन करतात, तेव्हा सर्वांची श्वासोच्छ्वास आणि हृदयगती एकसंध होते…

• यामुळे एकत्रित ऊर्जा निर्माण होते आणि मनाला सुरक्षितता व आपुलकी वाटते…

६. स्मरणशक्ती, भाषा आणि संस्कृतीची जपणूक…

• अभंगामधून भाषा, संस्कार आणि संतांची शिकवण मनात ठसते…

• हे गीतांमधून शिकणं मेंदूला दीर्घकाळ लक्षात राहतं…

समाजमानसावर संस्कार घडवून आणणारं असं ठरतं…

सारांश :–

भजनाचा वैज्ञानिक वैज्ञानिक फायदा म्हणजे

डोपामिन-ऑक्सिटोसिन वाढ होणे, आनंद मिळणे, सदा चैतन्यमयी वृत्तीने वावरणे..

आणि आध्यात्मिक अनुभव म्हणजे भगवंताशी प्रेमभाव वाढणे, मेंदू संतुलन बुद्धी आणि भक्ती यांचा समन्वय होऊन वेगस नर्व्ह्स ला सक्रिय करून चित्तवृत्तींचा निरोध होणं आणि समर्पित भावनात्मक शुद्धी होणं, आंतरिक हलकं वाटणं हे प्रत्येकासाठी आवश्यक आहे.

अन्वयार्थ:-

भगवंत सर्वत्र आहेत याची जाणीव

स्मरणशक्ती व संस्कृती टिकवणं संतांचे विचार जीवनात रूजवणे आणि नियमित भजन म्हणजे मन, बुद्धी आणि आत्म्याचं सुंदर संयोजन आहे. हे करणे म्हणजे स्वतःला आणि कुटुंबाला शांती, सात्विकता व कृपेसाठी सज्ज करणं होय…

राम कृष्ण हरी


Bhartiya Sangeet Kalapith Author
View profile

Comments (0)

No comments yet.