Sangeet Jagat संगीत जगत
Donate

विरुद्ध आहार म्हणजे काय ?

विरुद्ध आहार,viruddh ahar

सध्याच्या काळात बऱ्याचदा आपल्या आहारात आढळणाऱ्या विरुद्धाहाराची यादी आपल्या प्रश्नाचे उत्तर म्हणून शेयर करतोय.

– दूध + फळ/मीठ/मांस/मासे/आंबट असे एकत्र वा लगेच मागेपुढे खाणे.

– वरण भात + दूध

– दूध घातलेला चहा + चपाती/भाकरी/बिस्कीट

– चहासोबतच नाश्ता करणे

– मिल्कशेक वा केळ्याची दुधातील शिक्रण

– दही तसेच मध गरम करणे वा गरम पदार्थांवर घेणे

– तूप + मध हे मिश्रण समप्रमाणात घेणे

– विशेषतः पंजाबी भाज्या वगैरे तयार करताना त्यांत दूध/क्रीम इ. घालणे

– भाज्यांचे ब्लांचिंग करणे

– तूप वा तळलेले पदार्थ खाल्ल्यावर थंड पाणी पिणे

– शिळे पदार्थ खाणे

– फ्रीजचा अवाजवी वापर (विशेषतः मळलेली कणिक वा शिजवलेला भात फ्रीजमध्ये ठेवून वापरण्याची फॅड्स)

जेवताना दूध घातलेले खिरीसारखे गोड पदार्थदेखील शक्यतो टाळणे इष्ट.

? माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा…!

Prof. Rahul G. Aghade Author

Founder & CEO of Bhartiya Sangeet Kalapith, Editor-in-Chief of E-Sangeet Jagat

View profile

Comments (0)

No comments yet.