Sangeet Jagat संगीत जगत
Donate

कमी वयात केस पांढरे का होतात

कमी वयात केस पांढरे का होतात

??‍?लहान वयातच केस पांढरे झालेत..?

त्यामागील कारणे नि उपाय जाणून घ्या..

??‍♂️ आजकाल मुलांचे केस अगदी 20 व्या वर्षीच पांढरे होतात. पांढऱ्या केसांची लाज वाटत असल्याने ते लपवण्यासाठी लोक केसांमध्ये हेअर कलर, हेअर प्राॅडक्ट्स वापरतात.

?️ 2016 मध्ये ‘इंडियन जर्नल ऑफ डर्मेटोलॉजी’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, भारतात ‘केनाइटिस’ रोगामुळे लहान वयात मुलांचे केस पांढरे होत आहेत. केस पांढरे होण्याची कारणे, त्यावरील उपाय जाणून घेऊ या….

??‍♂️ तणाव:

सततच्या ताण-तणावामुळे निद्रानाश, चिंता नि भूक न लागणे अशा समस्या उद्भवातात. त्यामुळे शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होऊन केस गळतात, ते पांढरे होऊ शकतात.

? मसालेदार पदार्थ:

सध्या तरुणांना चमचमीत, मसालेदार पदार्थ आवडतात. विशेषत: मिरची, मीठ आणि आंबट पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील पित्त वाढते. गरम चीजच्या अतिसेवनानेही केस पांढरे होऊ लागतात.

? जास्त वेळ सूर्यप्रकाश घेणे:

सूर्याची ‘अल्ट्रा व्हायोलेट’ किरणे केवळ त्वचेसाठीच नाही, तर केसांसाठीही हानीकारक असतात. जास्त वेळ उन्हात बसल्याने केस अकाली पांढरे होऊ शकतात.

? ‘व्हिटॅमिन-सी’ची कमतरता:

‘व्हिटॅमिन-सी’च्या कमतरतेमुळे केस गळतात. अकाली पांढरे होतात. ‘व्हिटॅमिन सी’ असणारे फळे, भाज्या खाल्ल्यास केस पातळ होत नाहीत. केसांचा पोत सुधारतो. खराब झालेले केसही सुधारतात.

??‍♂️ केस काळेभोर राहण्यासाठी हा उपाय करा..

आहारात लिंबू, पेरू, पपई, द्राक्ष, संत्री, बेरी, रताळे यांसारखी फळे खावीत. त्यातून शरीराला पुरेसे ‘व्हिटॅमिन-सी’ मिळते. शिवाय पालक, कोबी, ब्रोकोली, टोमॅटो अशा भाज्या खाणेही फायद्याचे ठरते.

Prof. Rahul G. Aghade Author

Founder & CEO of Bhartiya Sangeet Kalapith, Editor-in-Chief of E-Sangeet Jagat

View profile

Comments (0)

No comments yet.