?? दिवसा झोपण्याचा फायदा की तोटा ? आरोग्यावर होतो ‘असा’ परिणाम..!
??♀️ कामाच्या ताणामुळे अनेकांना दिवसा एक डुलकी मारायला आवडतं. त्यामुळे थकवा जाऊन पुन्हा फ्रेश वाटत असल्याचे सांगितले जाते. मात्र, दिवसा झोपल्याने आरोग्याला काही तोटेही होतात.
? दुपारच्या झोपेमुळे आरोग्यावर काय परिणाम होतो, दुपारी झोपावे का, किती वेळ झोपावे, याबाबत जाणून घेऊ या..
? आरोग्यावर होणारा परिणाम..
▪️ दिवसा झोपल्याने रात्रीच्या नैसर्गिक झोपेच्या चक्रावर परिणाम होऊ शकतो. रात्री चांगली झोप येत नाही.
▪️ दिवसा झोपल्याने स्मरणशक्ती सुधारते, परंतु सतर्कता कमी होत असल्याचे संशोधनातून पुढे आलेय. दुपारी एक तासापेक्षा जास्त वेळ झोपल्याने शरीर सुस्तावतं.
▪️ आयुर्वेदानुसार, दिवसा झोपल्याने कफ व पित्त दोषात असंतुलन होतं. मात्र, निरोगी लोक उन्हाळ्यात दिवसा झोपू शकतात.
▪️ मधुमेह, लठ्ठपणा असणाऱ्यांनी दिवसा झोपू नये. त्यामुळे वजन वाढणं, ताप, स्मरणशक्ती व रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते.
⏰ किती वेळ झोपावं?
दुपारी 15 ते 20 मिनिटं झोपणं आरोग्यासाठी चांगलं ठरतं. मात्र, त्यासाठी झोपताना अलार्म सेट करा, शांतपणे झोपून ठरलेल्या वेळेत उठावे.
Comments (0)
No comments yet.
Log in or join to comment