Sangeet Jagat संगीत जगत
Donate

हायपरटेंशनपासून सुटका करण्यासाठी हे उपाय करा

> डाएट हेल्दी ठेवा : हायपरटेंशनपासून वाचण्यासाठी आपल्या डाएटची काळजी घ्यावी. अरबट चरबट खाऊ नये. चुकीच्या खाण्याच्या सवयीने देखील हा आजार होतो.

> वजन नियंत्रित ठेवणे : जर तुमचे वजन जास्त आहे. तर वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवा. जास्त वजन झाल्यास देखील ब्लड प्रेशर वाढते.

> कमी मीठाचा वापर करणे : आपण कमीत कमी मिठाचा आहारात वापर करावा. कमी मीठ खाल्याने तुमचे ब्लड प्रेशर नियंत्रणात राखण्यात मदत मिळते. मिठात सोडीयमचे प्रमाण असते ते ब्लड प्रेशर वाढविते.

> ताण-तणाव वाढू देऊ नका : जास्त विचार केल्याने ताण-तणावामुळे देखील ब्लड प्रेशर वाढते. तुम्ही जेवढा स्ट्रेस घ्याल तेवढा ब्लड प्रेशर हाय होतो. यासाठी तुम्ही योगासने करा.

> योग आणि मेडीटेशन करा : योग आणि मेडीटेशन देखील ताण-तणाव कमी करण्यास मदत करते. यष्टीकासन, हस्तपादांगुष्ठान, भद्रासन आणि मत्स्यासन सारखी आसने करा. योगासनाने रक्ताभिसरण चांगले होते. मन शांत होण्यास मदत होते.

Bhartiya Sangeet Kalapith Author
View profile

Comments (0)

No comments yet.