Sangeet Jagat संगीत जगत
Donate

दिवसा झोपण्याचा फायदा की तोटा ?

दिवसा झोपण्याचा फायदा की तोटा?

?? दिवसा झोपण्याचा फायदा की तोटा ? आरोग्यावर होतो ‘असा’ परिणाम..!

??‍♀️ कामाच्या ताणामुळे अनेकांना दिवसा एक डुलकी मारायला आवडतं. त्यामुळे थकवा जाऊन पुन्हा फ्रेश वाटत असल्याचे सांगितले जाते. मात्र, दिवसा झोपल्याने आरोग्याला काही तोटेही होतात.

? दुपारच्या झोपेमुळे आरोग्यावर काय परिणाम होतो, दुपारी झोपावे का, किती वेळ झोपावे, याबाबत जाणून घेऊ या..

? आरोग्यावर होणारा परिणाम..

▪️ दिवसा झोपल्याने रात्रीच्या नैसर्गिक झोपेच्या चक्रावर परिणाम होऊ शकतो. रात्री चांगली झोप येत नाही.

▪️ दिवसा झोपल्याने स्मरणशक्ती सुधारते, परंतु सतर्कता कमी होत असल्याचे संशोधनातून पुढे आलेय. दुपारी एक तासापेक्षा जास्त वेळ झोपल्याने शरीर सुस्तावतं.

▪️ आयुर्वेदानुसार, दिवसा झोपल्याने कफ व पित्त दोषात असंतुलन होतं. मात्र, निरोगी लोक उन्हाळ्यात दिवसा झोपू शकतात.

▪️ मधुमेह, लठ्ठपणा असणाऱ्यांनी दिवसा झोपू नये. त्यामुळे वजन वाढणं, ताप, स्मरणशक्ती व रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते.

⏰ किती वेळ झोपावं?

दुपारी 15 ते 20 मिनिटं झोपणं आरोग्यासाठी चांगलं ठरतं. मात्र, त्यासाठी झोपताना अलार्म सेट करा, शांतपणे झोपून ठरलेल्या वेळेत उठावे.

Prof. Rahul G. Aghade Author

Founder & CEO of Bhartiya Sangeet Kalapith, Editor-in-Chief of E-Sangeet Jagat

View profile

Comments (0)

No comments yet.